Haridwar Family Accident In Jaipur
ESakal
देश
Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू
Haridwar Family Accident In Jaipur News: हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.
जयपूरमधील शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये हरिद्वारहून परतणाऱ्या एका कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री उशिरा घडल्याचे सांगितले जात आहे. ज्याची माहिती लोकांना सकाळी कळली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. अपघात इतका भीषण होता की या अपघातात कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला.