दिवसाला छापतात 80,00,00,00,00,000 रूपये

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर नोटांबद्दलची सर्वसामान्यांची उत्सुकता वाढली आहे. नोटा कोठे छापतात? कशा छापतात? किती छापतात? यासारखे प्रश्‍न आपल्याला पडतात. या पार्श्‍वभूमीवर काही प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे -

1. दोन हजारांच्या नोटा कुठे छापताहेत?

सलबोनी (पश्चिम मीदनापूर, पश्चिम बंगाल) आणि मैसूर (कर्नाटक)

2. नोटांची छपाई कोण करतेय?

भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम (Security Printing And Minting Corporation Of India)

3. सलबोनी आणि मैसूरच्या प्रेसचे व्यवस्थापन कोणाचे?

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर नोटांबद्दलची सर्वसामान्यांची उत्सुकता वाढली आहे. नोटा कोठे छापतात? कशा छापतात? किती छापतात? यासारखे प्रश्‍न आपल्याला पडतात. या पार्श्‍वभूमीवर काही प्रश्‍न आणि त्यांची उत्तरे -

1. दोन हजारांच्या नोटा कुठे छापताहेत?

सलबोनी (पश्चिम मीदनापूर, पश्चिम बंगाल) आणि मैसूर (कर्नाटक)

2. नोटांची छपाई कोण करतेय?

भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम (Security Printing And Minting Corporation Of India)

3. सलबोनी आणि मैसूरच्या प्रेसचे व्यवस्थापन कोणाचे?

रिझर्व्ह बँकेच्या मालकीची भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेड कंपनी दोन्ही प्रेसचे व्यवस्थापन पाहते

4. रोज किती नोटा छापतात?

 •  एका सिक्युरिटी प्रेसमध्ये दोन हजार रूपयांच्या दोन कोटी नोटा दिवसाला छापतात.
 •  एका सेकंदात 2, 315 नोटा छापल्या जातात..
 •  दोन प्रेसमध्ये मिळून प्रत्येक दिवशी 4 कोटी नोटांची छपाई होते. 
 •  एका दिवसात छापलेल्या नोटांचे बाजारमुल्य आहे 80,00,00,00,00,000 रूपये

5. पाचशेच्या नव्या नोटांबद्दल काय?

पाचशेच्या नव्या नोटांची छपाई ऑक्टोबरमध्ये सुरू झालीय.

6. पाचशेच्या नव्या नोटा कुठे छापताहेत?

पाचशेच्या नव्या नाशिक (महाराष्ट्र) आणि देवास (मध्य प्रदेश) येथील सिक्युरिटी प्रेसमध्ये छापताहेत.

7. भारताला नोटा छापण्यासाठी किती कागद लागतो?

 • भारतात वर्षाला 22 हजार मेट्रिक टन इतका कागद लागतो. हा कागद म्हणजे 88 लाख रिम. 
 • खास पर्यावरणवाद्यांसाठीः 16.67 रिम कागदासाठी एक झाड कापावे लागते.
 • भारताच्या पैशासाठी वर्षाला 5, 27, 895 झाडे कापावी लागतात.
 • भारतापेक्षा चीनला वर्षाकाठी जास्त पैसे छापावे लागतात.

8. नोटा छापण्यासाठी किती खर्च येतो?

उत्पादन खर्चाच्या एकूण 40 टक्के खर्च फक्त कागदावर होतो. जून 2016 रोजी संपलेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने 21.2 अब्ज नोटा छापण्यासाठी 3, 421 कोटी रूपये खर्च केले. 

9. नोटा आपल्यापर्यंत पोहोचतात कुठून?

छापलेल्या नव्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत अहमदाबाद, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्वर, बेलापूर (नवी मुंबई), कोलकता, चंदीगड, चेन्नई, गुवाहटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई (फोर्ट), नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरूवअनंतपूरम येथील कार्यालयांमध्ये पाठवल्या जातात.

 • ही कार्यालये त्या त्या भागातील आरबीआयच्या अन्य कार्यालयांमध्ये नव्या नोटा पाठवतात.
 • स्थानिक कार्यालयांमधून स्थानिक कोषागार शाखांमध्ये नव्या नोटा वितरीत होतात. 
 • स्थानिक कार्यालयांमधून बँकांमध्ये नोटा पाठविल्या जातात.
 • बँकांमार्फत अन्यत्र नोटांचे वितरण होते. 

10. मुळात, भारतात पहिली नोट आलीच कुठून?

 • इंग्रजांनी 1862 मध्ये रूपयाची पहिली नोट आणली. 
 • इंग्लंडमधील थॉमस दे ला रू कंपनीने भारताची पहिली नोट छापली.
 • थॉमस दे ला रू यांनी स्थापन केलेली ही कंपनी 1831 पासून छपाई व्यवसायात आहे.
 • दे ला रू आज जगभरातील 150 देशांच्या नोटा छापून देते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FAQs about Note Printing