Faridabad Crime
esakal
फरीदाबाद जिल्हा न्यायालयाने (Faridabad District Court) दोन निरपराध मुलांचा गळा दाबून खून करणाऱ्या वडिलांना आणि सावत्र आईला दोषी ठरवत दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी ३०,००० रुपयांचा दंड ठोठावला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरेंद्र कुमार यांच्या न्यायालयात हा खटला सुनावला गेला. या प्रकरणात १९ साक्षीदार न्यायालयात हजर केले गेले. प्रत्यक्षदर्शी नसतानाही उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोघांनाही दोषी ठरविण्यात आले.