

Shocking Daylight Murder Inside Faridabad School
esakal
हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका शाळेत दिवसाढवळ्या एका शिक्षिकेची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. शाळेतील एका प्रशासकीय कर्मचाऱ्याने त्या शिक्षिकेला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु हल्लेखोराने त्यालाही चाकूचा धाक दाखवला.आरोपीने महिलेवर चाकूने अनेक वार केले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. ही अंगावर काटा आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.