esakal | राहुलजी हा काय चमत्कार झाला?; जेपी नड्डांनी व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

jp_20nadda_20and_20rahul_20gandhi

सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्या. पण, अजूनही यावर तोडगा निघू शकलेला नाही.

राहुलजी हा काय चमत्कार झाला?; जेपी नड्डांनी व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- नव्या कृषी (Farm Laws) कायद्यावरुन शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये रोध कायम आहे. शेतकरी गेल्या 32 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्या. पण, अजूनही यावर तोडगा निघू शकलेला नाही. शेतकरी प्रतिनिधींची सरकारसोबत 29 डिसेंबरला पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सरकारवर या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा (Rahul Gandhi) संसदेतील भाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

घर, पैसा असलेले लोकही फक्त 10 हजारांसाठी झालेत फेरीवाले!

हा काय चमत्कार होत आहे राहुल जी? पूर्वी तुम्ही ज्या गोष्टीचे समर्थन करत होता, आता त्याचाच विरोध करत आहात. देश हित, शेतकरी हित याच्याशी तुमचं काही देणंघेणं नाही. तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे. पण, तुमचं दुर्दैव आहे ती तुमचे हे ढोंग चालणार नाही. देशाची जनता आणि शेतकरी तुमचे दुहेरी चरित्र जाणून आहेत, अशी बोचरी टीका जेपी. नड्डा यांनी केली आहे. 

राहुल गांधी जेव्हा अमेठी मतदारसंघातून खासदार होते, त्यावेळीचा व्हिडिओ नड्डा यांनी शेअर केला आहे. राहुल गांधी व्हिडिओमध्ये संसदेतील भाषणात बटाट्याच्या पिकाचा हवाला देत एका शेतकऱ्यासोबतच्या चर्चेचा उल्लेख करतात. राहुल गांधी म्हणतात, शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं की ते दोन रुपये किलोंनी बटाटे विकतात. पण चिप्सच पॅकेट 10 रुपयांना मिळते. मधली किंमत दलाल खाऊन जातात. त्यामुळे जर शेतकरी थेट फॅक्टरीमध्ये आपले उत्पादन विकू शकला, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

फिरायला जाण्याचा प्लॅन बनवताय? चला विदर्भाच्या काश्मिरात; 'ही' आहेत...

दरम्यान, कृषी कायद्याच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप नव्या कृषी कायद्यांचे समर्थन करत आहे, तर विरोधी पक्ष या कायद्यांना जोरदार विरोध करत आहे. नव्या कृषी कायद्यांमध्ये कॉर्पोरेट कंपन्याचा फायदा होईल, तसेच शेतकऱ्यांना बड्या कंपन्यांच्या मर्जीवर रहावं लागले, असा दावा विरोधकांनी केला आहे. 

loading image
go to top