
राज्य महामार्गात जमिन गेली पण त्याचा पुरेसा मोबदला न मिळाल्यानं एका शेतकऱ्यानं थेट रस्त्यावरच भिंत बांधल्याची घटना घडलीय. यामुळे वाहतूक वळवण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली. हरियाणात कुरुक्षेत्रातील पहोवा इथं घडलीय. बलविंदर सिंह असं शेतकऱ्याचं नाव असून कुटुंबाने राज्य महामार्गावर भिंत बांधण्यास सुरुवात केलीय. कोर्टाने १२ वर्षांपूर्वी जमीन किंवा नुकसानभरपाई शेतकऱ्याला द्यावी असे आदेश सरकारला दिले होते. पण अद्याप मोबदला मिळाला नसल्यानं शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं.