Farmer Protest : PM मोदींनी शंभरहून अधिक लोकांसमोर माफी मागितली; NRI व्यावसायिकाच्या दाव्याने खळबळ

पंजाबमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाने अवघ्या देशाचं लक्ष केंद्रीत केले होते.
Narendra Modi
Narendra Modi Sakal

Darshan Dhaliwal : पंजाबमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाने अवघ्या देशाचं लक्ष केंद्रीत केले होते.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Narendra Modi
Flights Shutdown in US : संपूर्ण अमेरिकेतील विमानसेवा ठप्प; हजारो प्रवासी अडकले

शेतकऱ्यांच्या या आंदोलनानंतर केंद्राकडून वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले. मात्र, या सर्वामध्ये शेतकरी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या अमेरिकास्थित NRI उद्योगपती आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार विजेते दर्शन सिंह धालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठा दावा केला आहे.

Narendra Modi
Ebola Outbreak : कोरोना रूग्णवाढीत WHO कडून मोठी घोषणा

'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना धालीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल 2022 मध्ये मला विमानतळावरून परत पाठवण्याच्या घटनेबद्दल माफी मागितली होती असा दावा धालीवाल यांनी केला आहे.

मोदींनी 150 लोकांसमोर माझी माफी मागत 'आम्ही खूप मोठी चूक केली, तुम्हाला परत पाठवले, पण तुमचे मोठेपण की आम्ही बोलावल्यानंतर तुम्ही पुरस्कार स्वीकारण्यास परत आल्याचे.मोदी म्हटले, असे धालीवाल यांनी म्हटले आहे.

Narendra Modi
Modi Cabinet : BHIM UPI च्या ट्रांजॅक्शनवर मिळणार इन्सेटिव्ह; वाचा महत्त्वाचे निर्णय

राजधानी दिल्लीत सीमेजवळ शेतकरी आंदोलनात लंगरची व्यवस्था केल्याच्या आरोपावरून दर्शनसिंग धालीवाल यांना २३ आणि २४ ऑक्टोबर २०२१ च्या रात्री दिल्ली विमानतळावरून परत पाठवण्यात आले होते.

धालीवाल यांचा मंगळवारी (दि. १० जानेवारी) देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार स्वीकारल्यानंतर 'द इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना धालीवाल यांनी हा दावा केला आहे.

Narendra Modi
Ajit Pawar मुश्रीफांवरील कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सध्या राज्यात...

अधिकाऱ्यांनी दिले होते दोन पर्याय

धालीवाल म्हणाले की, विमानतळावरील अधिकाऱ्यांनी मला दोन पर्याय दिले होते. त्यापैकी एक म्हणजे लंगर थांबवून शेतकऱ्यांशी मध्यस्थी करण्याचा पहिला पर्याय दिला होता. तर, दुसरा पर्याय परत जाण्याचा दिला होता.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या परत पाठवण्यारे भारत सरकार आज मला सर्वोच्च पुरस्कार प्रदान करत आहेत. ही सर्व देवाची दया आहे. यावेळी त्यांनी पंजाब सरकारकडून अनेक पुरस्कार मिळाल्याचेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com