
मंगळवारी दिल्ली पोलिस आणि कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दरम्यान लाल किल्ला आणि आयटीओ परिसरात संघर्ष झालेला पहायला मिळाला.
नवी दिल्ली : मंगळवारी दिल्ली पोलिस आणि कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दरम्यान लाल किल्ला आणि आयटीओ परिसरात संघर्ष झालेला पहायला मिळाला. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेड प्रकरणी 22 FIR दाखल केल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आधी ट्रॅक्टर परेडच्या प्रकरणी तीन FIR दाखल केले होते.
VIDEO : केरळ टू काश्मीर - फक्त 170 रुपये घेऊन अवलियाची 'सायकल टूर'
दिल्ली पोलिसांनी मंगळवारी जवळपास 200 आंदोलनकर्त्यांना दंगल घडवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. पूर्ण तपास केल्यानंतर ही अटक करण्यात आली असून 22 एफआयआर दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. दिल्ली पोलिसांनी 9 शेतकरी नेत्यांच्या उल्लेखासह एफआयआर दाखल केला आहे. यात योगेंद्र यादव यांचेही नाव आहे.
एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पूर्व जिल्ह्यामध्ये तीन FIR दाखल केल्या गेल्या आहेत. द्वारकामध्ये तीन आणि शाहदरा जिल्ह्यात एक प्रकरण दाखल केले गेले आहे. त्यांनी म्हटलं की, आणखी FIR दाखल होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. आदल्या दिवशी हजारो शेतकर्यांनी तीन कृषी कायद्यांच्या विरोधात हजारो आंदोलकांनी पोलिसांनी बनवलेले बॅरिकेड्स तोडले आणि पोलिसांशी दोन हात केले, वाहने तोडली आणि लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकवला.
कोरोनाकाळात भारतातील श्रीमंतांच्या संपत्तीत ३५ टक्के वाढ; लाखोंनी गमावला रोजगार
86 पोलिस कर्मचारी जखमी
पोलिसांनी आपलं वक्तव्य जाहीर करताना सांगितलं की, या हिंसेत पोलिसांचे 86 कर्मचारी जखमी झाले आहेत. संघर्षाच्या ठिकाणी एका आंदोलकाचा ट्रॅक्टर उलटला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या वक्तव्यात म्हटलं गेलंय की, संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकरी ट्रॅक्टर परेडचं आयोजन केलं गेलं होतं. या नियजित ट्रॅक्टर परेडच्या संबंधी दिल्ली पोलिसांसमवेत अनेक बैठका झाल्या होत्या.
15 FIRs have been registered in connection with the violence during farmers' tractor rally yesterday. So far, 5 FIRs have been lodged in Eastern Range: Delhi Police Sources
— ANI (@ANI) January 27, 2021
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी सकाळी जवळपास 8.30 वाजता सहा ते सात हजार ट्रॅक्टर सिंघू सीमेवर जमले होते. नियोजनात ठरलेल्या मार्गावरुन जाण्याऐवजी त्यांनी दिल्लीच्या दिशेने जाण्यावर भर दिला. वारंवार सांगूनही आग्रह करुनही आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने आणलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकारने कायद्यांमध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवलीये, पण कायदे रद्द करणार नसल्याचं म्हटलं आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत 11 चर्चेच्या फेऱ्या पार पडल्या आहेत, पण अजूनही यावर तोडगा निघू शकलेला नाही. शेतकऱ्यांचा प्रजासत्ताक दिनी बांध फुटल्याचं पाहायला मिळालं.