
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हरियाना-दिल्लीच्या टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्यांपैकी एका आंदोलक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या शेतकऱ्याने चिठ्ठी लिहिली असून यामध्ये केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.
नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात हरियाना-दिल्लीच्या टिकरी सीमेवर आंदोलन करणाऱ्यांपैकी एका आंदोलक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या शेतकऱ्याने चिठ्ठी लिहिली असून यामध्ये केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव कर्मबीर (वय ५२) असून ते हरियानाीतील जिंद येथील सिंघवाल गावचे रहिवासी होते. टिकरी सीमेवर आंदोलन करताना सेक्टर ९ जवळ बायपास पार्कमध्ये एका झाडाला त्यांनी स्वतःला लटकवून घेतले.
जितेंद्र आव्हाडांची गणेश नाईकांवर टीका ते पोपनी परंपरा काढली मोडित; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारवर आरोप करताना कृषी कायदे मागे घेण्यात सरकार सतत चालढकल करत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हे काळे कायदे कधी रद्द होतील माहिती नाही, जोपर्यंत हे काळे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, असेही चिठ्ठीत लिहिले आहे.
पाकिस्तानी-खलिस्तानी अकाउंट बंद करा; सरकारचा ट्विटरला पुन्हा आदेश
आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
टिकरी सीमेवरच आणखी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यापैकी एक शेतकरी पंजाबच्या संगरुर आणि दुसरा मोगा जिल्ह्यातील रहिवासी होता. मात्र, अद्याप त्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झालेली नाही. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. मृतांपैकी एकाचे वय ६० वर्षे तर, दुसरा ७० वर्षांचा होता.
Edited By - Prashant Patil