
कर्ज काढून घेतलेल्या ट्रॅक्टरचा शेवटचा हफ्ता राहिला होता. शेतकऱ्याला शेवटचा हफ्ता लवकर देता येत नव्हता आणि बँकेकडून वसुलीसाठी तगादा लावण्यात आला होता. बँकेनं शेवटी शेतकऱ्यावर दबाव टाकत ट्रॅक्टर ओढून नेऊ असा इशारा दिला. ट्रॅक्टर ओढून नेतील आणि आपली बदनामी होईल या भीतीने शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात ही घटना घडलीय. चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यानं ट्रॅक्टर घेतला होता. आतापर्यंतचे सर्व हफ्ते त्यानं वेळेत भरले होते. पण यावेळी पीक चांगलं न आल्यानं शेवटचा हफ्ता देता आला नव्हता.