देशभरातील शेतक-यांनी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन पुन्हा सुरु केले आहे. या आंदोलनाचा भाग शेतकरी संघटना म्हणून आज 16 डिसेंबर रोजी पंजाब व्यतिरिक्त इतर राज्यांत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. याशिवाय 18 डिसेंबर रोजी पंजाबमध्ये 'रेल रोको' आंदोलन करण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. पंजाबचे शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंजाबमधील रेल रोको आंदोलनासाठी त्यांनी 13 हजार गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना दुपारी 12 वाजता रेल्वे ट्रॅक रोखण्यासाठी आवाहन करण्यात केले आहे.