Good News For Farmers : कर्जावरील व्याजात १.५ टक्के सूट; शेतकऱ्यांसाठी मोदी मंत्रिमंडळाची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Discount On Loan Interest For Farmers

Good News For Farmers : कर्जावरील व्याजात १.५ टक्के सूट; मोदी मंत्रिमंडळाची घोषणा

Discount On Loan Interest For Farmers नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी (Farmers) मोठी घोषणा केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने अल्प मुदतीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत योजना सुरू ठेवली आहे. म्हणजेच तीन लाखांपर्यंतचे अल्पमुदतीचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना व्याजात १.५ टक्के सूट (Loan Interest) मिळणार आहे.

नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने शेतकऱ्यांना मोठा फायदा देत व्याज सवलत योजना कायम ठेवली आहे. केंद्र सरकारला योजना लागू करण्यासाठी २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीसाठी ३४,८५६ कोटींची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद आवश्यक आहे. भरपाईसाठी सरकार ही देयके थेट कर्ज देणाऱ्या बँका आणि सहकारी संस्थांना देईल.

हेही वाचा: Boycott Bollywood Trend : अर्जुन कपूरची युजर्सनी काढली लायकी; तुझे चित्रपट...

शेतकऱ्यांना (Farmers) शासनाकडून सहकारी व बँकांमार्फत अल्प व्याजदरात अल्प व दीर्घ मुदतीसाठी कर्ज दिले जाते. अनेक शेतकरी या कर्जाची वेळेवर परतफेड करतात तर अनेक शेतकरी काही कारणास्तव वेळेवर परतफेड करू शकत नाहीत. जे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करतात त्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळेल.

हे आहेत फायदे

  • सतत व्याज सवलत दिल्याने कर्ज देणाऱ्या संस्थांचे आर्थिक आरोग्य आणि व्यवहार्यता सुनिश्चित होईल

  • विशेषतः: प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका. ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुरेशा कृषी कर्जाची खात्री होईल

  • शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या कृषी गरजांसाठी कर्ज घेण्यास प्रोत्साहन मिळेल.

  • अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा लाभ मिळू शकेल. त्यामुळे रोजगारही निर्माण होईल.

  • पशुसंवर्धन, दुग्ध, कुक्कुटपालन, मत्स्यपालन यासह सर्व कामांसाठी शेतकऱ्यांना थेट प्रोत्साहन देईल.

  • लघुउद्योगांसाठी शेतकऱ्यांना अल्प व्याजावर अल्प मुदतीचे कृषी कर्ज मिळू शकणार आहे.

  • कर्जाची वेळेवर परतफेड करताना शेतकऱ्यांना वार्षिक ४ टक्के व्याजदराने अल्प मुदतीचे कृषी कर्ज मिळत राहील.

Web Title: Farmers Discount Loan Interest Modi Cabinet Announcement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..