दिल्लीच्या निवडणुकीत आला शेतकऱ्यांचा मुद्दा

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आम आदमी पक्षाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी विजेच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केलाय.

Delhi Election 2020 : नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत वातावरण चांगलच तापलंय. सत्ताधारी आम आदमी पक्षाला खाली खेचण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आम आदमी पक्षाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी विजेच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"उत्तर प्रदेश आणि हरियानातील शेतकऱ्यांना दिल्लीतून स्वस्त वीज पुरवली जात आहे. दोन्ही राज्यांच्या तुलनेत दिल्लीतील शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज ही बारापट महाग का आहे? शेतकऱ्यांना स्वस्त वीज का दिली जात नाही,' असा सवाल भाजपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांनी आज केला.

भाजप आमदाराची दादागिरी, शेजाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

दिल्ली विधानसभा निवडणूक आठ फेब्रुवारीला होणार असून, मतमोजणी 11 फेब्रुवारीला होणार आहे. निवडणुकीला आता काहीच आठवडेच शिल्लक असताना केजरीवाल सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. 'दिल्लीतील नागरिक उदासिनतेच्या छायेत जगत आहेत. आरोग्य, प्रदूषण, रस्ते या मुलभूत सुविधांपासूनही ते दूरच आहेत. 2020 च्या पहिल्याच दहा दिवसांत थंडीमुळे 90 जणांचा मृत्यू झाला. मागील डिसेंबर महिन्यात 323 जण असे सुमारे चाळीस दिवसांत 413 जणांचा मृत्यू झाला आहे.

सेंटर फॉर होलिस्टिकि सेंटरच्या रिर्पोटनुसार मागील वर्षात 3623 बेघर झालेल्यांचा मृत्यू झाला आहे. आप सरकारमध्ये याबाबत चर्चा होत नाही. हे सरकार याला जबाबदार आहे. लोक रस्त्यावर मरत आहेत, आणि इथे पाच वर्षे सरकार चांगले चालल्याची चर्चा मात्र केजरीवाल करत आहेत,' अशा शब्दांत तिवारी यांनी सरकारवर हल्लाबोल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers issue Raised in Delhi Assembly Election