esakal | शेतकरी आंदोलनात फूट; टिकैत यांनी विश्वासघात केला म्हणत एका गटाची माघार
sakal

बोलून बातमी शोधा

farmers protest

आंदोलनामध्ये आता फूट पडली असून ऑल इंडिया किसान समन्वय समितीचे नेते व्हिएम सिंह यांच्या गटाने माघार घेतली आहे.

शेतकरी आंदोलनात फूट; टिकैत यांनी विश्वासघात केला म्हणत एका गटाची माघार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - दिल्लीत झालेल्या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी हिंसक वळण लागले. या आंदोलनानंतर काही शेतकरी नेत्यांनी हातही झटकले होते. दरम्यान, आंदोलनात लाल किल्ल्यावर झालेल्या गोंधळाची आणि हिंसाचाराच्या घटनेची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, आंदोलनामध्ये आता फूट पडली असून ऑल इंडिया किसान समन्वय समितीचे नेते व्हिएम सिंह यांच्या गटाने माघार घेतली आहे. शेतकऱ्यांनी मार खावा यासाठी आंदोलन केलं नव्हतं असं म्हणत त्यांनी यापुढे आंदोलनात सहभागी होणार नाही असं म्हटलं आहे. 

व्हीएम सिंग म्हणाले की, आम्ही यापुढे आंदोलन करू शकणार नाही. त्यांना शुभेच्छा देतो. पण व्हीएम सिंग आणि ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समिती या आंदोलनातून माघार घेत आहे. तसंच राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असा आरोपही व्हिएम सिंग यांनी केला. राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली नाही असंही ते म्हणाले. 

loading image
go to top