esakal | हरियाणामध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पुन्हा पाण्याचे फवारे
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers Protest

हरियाणामध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पुन्हा पाण्याचे फवारे

sakal_logo
By
सुधीर काकडे

हरियाणामध्ये सध्या शेतकरी आंदोलन सुरु आहे. हरियाणामध्ये २८ ऑगस्टला आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाला होता. पोलिसांनी केलेल्या या लाठीचार्जमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याच प्रकरणाचा निशेध म्हणून हरियाणाच्या कर्नालमध्ये शेतकऱ्यांनी आज निदर्शनं केली. यावेळी याठिकाणी हजारो आंदोलक शेतकरी एकत्र आले होते. यावेळी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला असता, शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले. बॅरिकेड्स तोडल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारले.

हेही वाचा: मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर

स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनूसार, हरियाणा पोलिसांनी भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांना अटक केली होती. त्यानंतर काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले. 'हे आंदोलन रोखण्यासाठी सरकारची अपेक्षा आहे की, शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान शांतता भंग करावी. मात्र आपल्याला असे करायचे नाही.' असे म्हणत योगेंद्र यादव यांनी शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकऱ्यांचे आदोलन सुरु आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरु असलेल्या या आंदोलनात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्नीत असलेली भारतीय किसान संघ ही संघटना देखील सरकारच्या विरोधात मैदानात उतरणार आहे. भारतीय किसान संघाचे नेते बद्रीनाथ चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत ८ सप्टेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली. तसेच ऑगस्ट महिन्यात आम्ही आमच्या सर्व राज्यांच्या प्रतिनीधींशी चर्चा केली असून, देशातल्या ५०० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन केलं जाईल अशी माहिती दिली आहे.

loading image
go to top