खळबळजनक! ट्रॅक्टर रॅलीत 4 शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट? सिंघू सीमेवर संशयिताला आंदोलकांनी पकडले

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 23 January 2021

पकडलेल्या शूटरने माध्यमांसमोर दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दि. 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान तो 4 शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणार होता

नवी दिल्ली- दिल्ली-हरियाणा सिंघू सीमेवर शुक्रवारी रात्री खळबळजनक खुलासा झाला. सिंघू सीमेवर शेतकरी नेत्यांनी एका शार्प शूटरला पकडल्याचा दावा केला आहे. या शूटरचा चेहरा झाकून त्याला प्रसारमाध्यमांसमोर उभे करण्यात आले होते. हा शूटर मोठा घातपात करणार होता असा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. पकडलेल्या शूटरने माध्यमांसमोर दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दि. 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान तो 4 शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणार होता, असा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा सिंघू सीमेवर पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांनी या संशयिताला समोर आणले. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलिसांसाच्या वेशात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करुन गोंधळाचे वातावरण निर्माण करणार होतो, असा दावाही पकडण्यात आलेल्या व्यक्तीने केला आहे. विशेष म्हणजे या शूटरने जाट आंदोलनावेळी वातावरण बिघडवण्याचे काम केल्याचे कबूल केले आहे. 

शूटरने म्हटले की, 26 तारखेला चार लोक स्टेज वर असतील आणि त्यांच्यावर गोळ्या झाडायच्या होत्या. यासाठी या चार जणांचे फोटो शूटरला देण्यात आले होते. त्यांना हे सर्व सांगणारी व्यक्ती ही राई ठाण्याचे (हरियाणा) पोलिस अधिकारी प्रदीप असल्याचा गंभीर आरोपही त्याने केला. प्रदीप आम्हाला भेटायला येताना नेहमी चेहरा झाकून येत असत, असेही त्याने सांगितले. शेतकऱ्यांनी या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केले आहे. 

हेही वाचा- Video:हत्तीच्या अंगावर फेकली पेटती टायर; अमानुष प्रकाराने हत्तीचा मृत्यू

शेतकरी नेते कुलवंतसिंग संधू यांनी सरकारी संस्थांकडून शेतकरी आंदोलनात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. 

हेही वाचा- केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांवर भडकले; 11 वी बैठकही तोडग्याशिवाय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmers Protest Singhu Border farmer leaders allege plot to kill 4 of them during 26 January tractor rally