Farmer Protest Latest Uodate :गेल्या ९ महिन्यांपासून पंजाब-हरियाना सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज अखेर दिल्लीच्या दिशेने कूच केली. जवळपास १०० शेतकऱ्यांनी पायी दिल्लीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंबालाजवळच पोहोचताच हरियाना पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटपट झाल्याचं बघायला मिळालं.