आदि शंकराचार्यांनंतर राहुल गांधी दुसरे व्यक्ती जे...; फारुख अब्दुल्लांकडून कौतुक: Rahul Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi_Bharat Jodo Yatra

Rahul Gandhi: आदि शंकराचार्यांनंतर राहुल गांधी दुसरे व्यक्ती जे...; फारुख अब्दुल्लांकडून कौतुक

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये दाखल झाली आहे. या यात्रेत नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या पदयात्रेचं कौतुक केलं असून त्यांची तुलना थेट आदि शंकराचार्यांशी केली आहे. पण यामुळं आता वेगळ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Farooq Abdullah compares Rahul Gandhi to Adi Shankaracharya)

हेही वाचा: J&K Blast: जम्मूच्या नरवालमध्ये दोन शक्तीशाली स्फोट; ७ जण गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरच्या लखनपूर इथं भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर सभा पार पडली. या सभेत संबोधित करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, "आदि शंकराचार्यांनंतर राहुल गांधी हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर पदयात्रा केली आहे. अनेक दशकांपूर्वी शंकराचार्य इथं आले होते. जेव्हा इथं रस्ते नव्हते केवळ जंगलं होती, त्यावेळी शंकराचार्यांनी कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर हा खडतर प्रवास केला होता"

हेही वाचा: Sharad Pawar: ज्यांच्या तोंडी नेहमी साखर..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

या यात्रेचा उद्देश भारताला जोडणे हा असून भारतात सध्या द्वेषाचं वातावरण निर्माण केलं जात असून एकमेकांवर धार्मिक चिखलफेक सुरु आहे. गांधी आणि राम यांचा भारत एक होता जिथे आपण सर्व एक होतो. ही यात्रा भारताला जोडण्याचा प्रयत्न करत आहे. या यात्रेचे शत्रू भारताचे, मानवतेचे आणि लोकांचे शत्रू आहेत, असंही यावेळी अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

खुर्शीद यांनी राहुल गांधींची केली होती रामाशी तुलना

यापूर्वी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना श्रीरामाशी केली होती. खुर्शीद म्हणाले होते, "राहुल गांधी एक अलौकिक व्यक्ती आहेत. आम्ही थंडीत गारठून गेलो असताना आणि थंडीपासून बचावासाठी जॅकेट घालत आहेत पण राहुल गांधी टी-शर्टमध्ये 'भारत जोडो यात्रे'त चालत आहेत. राहुल गांधी हे एका योगी सारखे आहेत जे एकाग्रतेनं 'तपस्या' करत आहेत.

श्रीनगरमध्ये होणार 'भारत जोडो'ची सांगता

'भारत जोडो यात्रा' गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाली. कठुआच्या लखनपूर परिसरात या मोर्चानं प्रवेश केला. गुरुवारी संध्याकाळी या यात्रेत समर्थक मशाली घेऊन सहभागी झाले होते. फारुख अब्दुल्ला, पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या यात्रेत सहभाग नोंदवला. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली असून तिची सांगता ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे.

टॅग्स :Rahul GandhiDesh news