Sharad Pawar: ज्यांच्या तोंडी नेहमी साखर..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव | Eknath Shinde Showered Praises On Sharad Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Sharad Pawar: ज्यांच्या तोंडी नेहमी साखर..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

Eknath Shinde Showered Praises On Sharad Pawar: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर आले होते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक ४६ वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जेष्ठ नेते शरद पवार एकाच मंचावर आले होते.

हेही वाचा: Maharashtra Politics : NCPच्या नेत्याने काढलं काँग्रेसच्या बड्या नेत्याचं स्टँडर्ड म्हणाले...

एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. यावेळी काही व्याक्तींना संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत स्तुतीसुमणं उधळली त्यामुळे चर्चांना उधान आलं आहे.

हेही वाचा: Shiv Sena : निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाआधी निर्णय दिला तर तो निर्णय बदलू शकतो, वाचा कसं?

शिंदे म्हणाले "ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते असे जेष्ठ नेते शरद पवार असं म्हणत त्यांनी जयंत पाटील यांना चिमटा काढला, ते म्हणाले जयंत पाटील यांच्या तोंडी सुध्दा साखर असते. असं म्हणताच एकच हशा पिकला.

शिंदे पुढं म्हणाले "पवार साहेब नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचे योगदान खूप मोठे आहे. राज्याला मदत होण्यासाठी शरद पवार सतत सूचना करत असतात, आवश्यक तिथे मार्गदर्शन करत असतात, शरद पवार यांचे सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान खुप मोठं आहे, ते नाकारता येणार नाही."