esakal | फारुख अब्दुल्ला यांची ईडीकडून पुन्हा चौकशी 
sakal

बोलून बातमी शोधा

फारुख अब्दुल्ला यांची ईडीकडून पुन्हा चौकशी 

सोमवारी त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी चौकशीने आपण नाराज झालेले नसल्याचे मत व्यक्त करत अधिकाऱ्यांना सहकार्य करु, असे सांगितले. 

फारुख अब्दुल्ला यांची ईडीकडून पुन्हा चौकशी 

sakal_logo
By
पीटीआय

श्रीनगर - जम्मू-काश्‍मीर क्रिकेट संघटना (जेकेसीए)च्या कोट्यवधी गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची आज तीन दिवसात दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. ८४ वर्षीय फारुख अब्दुल्ला हे बुधवारी राजबाग येथील इडीच्या प्रादेशिक कार्यालयात हजर झाले. तत्पूर्वी सोमवारी त्यांची सहा तास चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी चौकशीने आपण नाराज झालेले नसल्याचे मत व्यक्त करत अधिकाऱ्यांना सहकार्य करु, असे सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख अब्दुल्ला यांचा जबाब पीएमएलएतंर्गत नोंदवला जाईल. या प्रकरणात फारुख अब्दुल्ला यांची प्रथम चौकशी गेल्यावर्षी जुलै महिन्यात चंडीगड येथे करण्यात आली. जेकेसीएचे अध्यक्ष असताना संघटनेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणात त्यांची भूमिका आणि निर्णयाची माहिती ईडीकडून गोळा केली जात आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ईडीकडून सीबीआयच्या तक्रारीच्या आधारे कारवाई केली जात आहे. सीबीआयने जेकेसीएच्या पदाधिकाऱ्यांना आरोपी केले असून त्यात सरचिटणीस मोहंमद सलीम खान आणि माजी कोषाध्यक्ष अहसान अहमद मिर्झा यांचा समावेश आहे. सीबीआयने २०१८ रोजी जेकेसीएच्या निधीतील सुमारे ४३.६९ कोटी रुपयाच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी अब्दुल्ला, खान, मिर्झा यांच्याशिवाय माजी कोषाध्यक्ष मंजूर गजनफ्फर अली, बशीर अहमद मिसगर, गुलजार अहमद बेग यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. राज्यातील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निधी भारतीय क्रिकेट मंडळाने २००२ ते २०११ दरम्यान दिला होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा