UP Shocking Relationship Case : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील राधा नगर पोलिस स्टेशन हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या पत्नीवर पाच लग्न केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या आरोपांनुसार, सध्या संबंधित महिला आपल्या भावासोबत अनैतिक संबंध (Immoral Relationship) ठेवत असल्याचे पतीचे म्हणणे आहे.