
Father and Son Killed Accident : मुलांना दवाखान्यात घेऊन जात असताना मोटारसायकल व बसची समोरासमोर धडक झाल्याने वडील व मुलगा ठार झाले, तर लहान मुलगा जखमी झाला. अथणी-अनंतपूर राज्य मार्गावर बेवनूर क्रॉसजवळ मंगळवारी (ता. १५) रात्री उशिरा हा अपघात झाला. नूर सिराज मुल्ला (वय ४६) व सोहेल नूर मुल्ला (वय १६, रा. मलाबाद, ता. अथणी) अशी ठार झालेल्या वडील व मुलाचे नाव आहे. तर दुसरा मुलगा सोयब नूर मुल्ला (वय १४) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.