Belagavi Wedding : मुलीच्या लग्नात कन्यादानानंतर पित्याचा हृदयविकाराने मृत्यू
Heart Attack : बेळगावमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी कन्यादान करून वडिलांनी आपले कर्तव्य पार पाडले, पण काही तासांतच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मच्छे येथे अतिशय हृदयद्रावक घटना घडली. मुलीच्या विवाहाप्रसंगी कन्यादान केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पित्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.