हाथरस पीडितेचे कुटुंबीय पडले आजारी; वडिलांचा रुग्णालयात जाण्यास नकार

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 October 2020

सोमवारी अलाहाबाद हाय कोर्टासमोर उपस्थित झाल्यानंतर हाथरस पीडितेचे कुटुंबीय आजारी पडले आहे.

नवी दिल्ली- सोमवारी  हाथरस पीडितेचे कुटुंबीय अलाहाबाद हाय कोर्टासमोर उपस्थित झाले होते. त्यानंतर आपल्या बुलगाडी गावात आल्यापासून त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेची आई, कुटुंबातील इतर दोन सदस्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. पण पीडितेच्या वडिलांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला असल्याचं कळत आहे. 

हाथरस वैद्यकीय अधिकारी ब्रिजेश राठोड यांनी 'एएनआय' या वृत्त संस्थेला ही माहिती दिली आहे. हाथरस पीडित कुटुंबीय आजारी पडल्यानंतर राठोड यांनी गावात जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. याआधी एक वैद्यकीय टीम कुटुंबीयांच्या भेटीसाठी गेली होती. पीडितेच्या वडिलांचा ब्लड प्रेशर वाढला आहे. असे असले तरी त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला आहे. 

दरम्यान, सीबीआयची टीम Central Bureau of Investigation (CBI) तपासासाठी हाथरसमध्ये पोहोचली आहे. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या एका दलित मुलीच्या कथित सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी सीबीआय तपास करत आहे. पीडितेची आई आणि भावाला गुन्हा झाला त्याठिकाणी घेऊन जाण्यात आले आहे. सीबीआयने आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 11 ऑक्टोंबर रोजी सीबीआयने या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father of Hathras rape victim not well, refuses to visit hospital