esakal | सासरे मुख्यमंत्री, जावई आमदार विधिमंडळात दिसणार अनोखा राजयोग

बोलून बातमी शोधा

Veena and Riyas got married in 15 june 2020
सासरे मुख्यमंत्री, जावई आमदार विधिमंडळात दिसणार अनोखा राजयोग
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोची : (वृत्तसंस्था) केरळमध्ये यंदा एक वेगळा योगायोग पाहायला मिळणार आहे. सासरे आणि जावई हे दोघेही विधिमंडळात एकत्र असतील. विशेष म्हणजे हे सगळे मुख्यमंत्री पी.विजयन (Pinarayi Vijayan) यांच्याचबाबतीत घडून आले आहे. सासरे विजयन हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्यांचे जावई पी.ए. मोहंमद रियाझ (P A Mohammed Riyas) हे देखील आमदारकीची शपथ घेतील. रियाझ हे डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. रियाझ यांनी काही दिवसांपूर्वीच विजयन यांच्या कन्या वीणा यांच्याशी विवाह केला होता. (Veena and Riyas got married) ते स्वतः आयटी क्षेत्रातील बडे उद्योजक असून बंगळूरमध्ये त्यांची स्वतःची कंपनी देखील आहे. यंदा विजयन हे कन्नूर जिल्ह्यातील धरमादम मतदारसंघातून पन्नास हजार मतांच्या फरकांनी विजयी झाले असून रियाझ (वय ४४) हे कोझीकोडमधील बेपोर मतदारसंघातून जिंकले आहेत. रियाझ हे स्वत ः युवकांचे नेते असून त्यांनी २००९ मध्ये कोझीकोड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक देखील लढविली होती पण ते त्यात पराभूत झाले होते.

हेही वाचा: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

यांना पराभवाचा धक्का

याशिवाय अन्य नेत्यांचा गोतावळा देखील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला होता. केरळ काँग्रेस (एम) चे अध्यक्ष जोस. के. मणी आणि त्यांच्या बहिणीचे पती एम. पी. जोसेफ हे पराभूत झाले. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष पी.जे. जोसेफ थोडूपुझ्झामधून विजयी झाले असून त्यांचे जावई डॉ. जोसेफ हे मात्र कोथामंगलममधून पराभूत झाले आहेत. माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची मुलेही मैदानात उतरली होती. काँग्रेस नेते के. मुरलीधरन आणि पद्मजा वेणुगोपाल यांनाही पराभव पत्कारावा लागला.

विजयन यांचा राजीनामा

तिरूअनंतपुरम : केरळमध्ये पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालीच डावी आघाडी सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर विजयन यांनी आज राज्यपालांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. आज दुपारीच विजयन यांनी राजभवन गाठ स्वतःचा राजीनामा राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांच्याकडे सादर केला अशी माहिती सूत्रांनी दिली. आता शपथविधी होईपर्यंत विजयन यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार असेल. विजयन हे पुढील आठवड्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

father in law Pinarayi Vijayan CM and son in law A Mohammed Riyas MLA in Kerala Assembly