esakal | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

yogi adityanath

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या कन्ट्रोल रुमच्या व्हॉट्सअॅपवर क्रमांकावर हा धमकीचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे. हा मेसेज मिळताच पोलीस प्रशासनानं अलर्ट जाहीर केला आहे. तसेच याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा मेसेज कुठल्या क्रमांकावरुन आला याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या हाहाकारात नव्या पंतप्रधान निवासाचं काम सुरु राहणार; सरकारची परवानगी

सुत्रांच्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी कन्ट्रोल रुमच्या ११२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर एक मेसेज आला होता. या मेसेजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाचव्या दिवशी जीवे मारण्यात येणार आहे, अशी धमकी देण्यात आली. हा धमकीचा मेसेज पाठवणाऱ्यानं म्हटलं की, "या चार दिवसांत माझ्यावर काय कारवाई करायची आहे ती करुन दाखवा." हा मेसेज आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती कन्ट्रोल रुमचे ऑपरेशन कमांडरच्या मुख्यालयाला दिली. त्यानंतर वरिष्ठ पातळीपर्यंत अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा: कोविडची सौम्य लक्षणं असल्यास आधी एक्स-रे काढा, सीटी स्कॅन टाळा - एम्स

ऑपरेशन कमांडरच्या आदेशानुसार, सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ज्या क्रमांकावरुन हा मेसेज आला आहे तो ट्रेस करण्याची आणि धमकी देणाऱ्याला शोधण्यासाठी पथकं नेमले आहेत.

यापूर्वीही मिळाली आहे धमकी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यापूर्वीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर, सप्टेंबर आणि मे महिन्यात ११२ या कन्ट्रोल रुमच्या क्रमांकावर धमकीचे फोन आले होते.

loading image