esakal | उत्तर प्रदेशात सैराट! वडिलांनीच 22 वर्षीय मुलीचा घेतला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

Crime Against Women

उत्तर प्रदेशात सैराट! वडिलांनीच तरुण मुलीचा घेतला जीव

sakal_logo
By
ओमकार वाबळे

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात २२ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी संशयित पित्याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार ऑनर किलिंगचा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बेबरू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिमाउनी गावात घडलेल्या या प्रकरणी मेहमूद खान (वय ४९) याला अटक केली. त्याने काल सायंकाळी ५.३० च्या सुमारास कन्या हसीना बानो हिला (वय २२) बेदम मारहाण केली आणि यातच तिचा मृत्यू झाला. हा प्रकार पाहून शेतात काम करणाऱ्या लोकांनी तिला दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

काही वर्षांपूर्वी खानने हसीना बानोला एका मुलाशी विवाह करण्याचा आग्रह केला होता. परंतु तिने नकार दिला. यानंतर चार वर्षांपासून ती बेपत्ता होती. परंतु पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आणि शोधाशोध कऱण्यात आली. अखेर ती सापडली, आणि नागरिकांनी तिला पित्याच्या हवाली केले होते. यानंतर पित्याने मुलीला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

loading image
go to top