
मुलाने बापाला प्रेयसीसोबत 'त्या' अवस्थेत पाहिलं; घाबरलेल्या पित्याने पोटच्या मुलालाच...
नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात एका ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या १५ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केला. मृत हरिओमचे कापलेले हात सुमारे ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये घालून त्याचा मृतदेह शेताच्या बांधावरील झुडपात फेकून देण्यात आला होता. ( Crime news in Marathi)
या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या पित्याला आणि त्याच्या ३५ वर्षीय प्रेयसीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बरोठा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मुलाची गळा आवळून हत्या केल्यानंतर पित्याने मुलाचे दोन हात ४०० फूट बोरवेलमध्ये फेकले. तसेच मृतदेहाचे उर्वरित भाग शेताच्या बांधावर फेकून दिले.
मोहनलालचे अटक करण्यात आलेल्या महिलेशी अनैतिक संबंध होते. हरीओमने त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यानंतर या महिलेने मोहनलालवर मुलाला ठार करण्यासाठी दबाव आणला. तसं केलं नाही तर स्वत:ला मारून घेण्याचा हट्ट धरला, त्यामुळे वडिलांनी आपल्याच मुलाची हत्या केली.
आरोपी मोहनलालचे गेल्या 5 वर्षांपासून आरोपी महिलेसोबत अनैतिक संबंध होते. हत्येपूर्वी हरिओमने दोघांनाही आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. या परिस्थितीनंतर मोहनलालला वाटले की तो सगळ्यांना सांगेल, म्हणून त्याने त्याचा खून केला.