Father Shoots Daughter for Refusing Arranged Marriage in Gwalior : प्रेम प्रकरणाला विरोध करत वडिलांनी स्वत:च्या मुलीवरच गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये ही घडना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुलीने व्हिडीओ बनवत आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मंगळवारी तिची हत्या करण्यात आली. चार दिवसांवर मुलीचं लग्न असताना वडिलांनी अशाप्रकारे तिची हत्या केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.