
जगप्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचे सोमवारी (१४ जुलै) पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात झालेल्या अपघातात निधन झाले. ते ११४ वर्षांचे होते. त्यांच्या मूळ गावी बियास येथे फिरायला गेले असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना जालंधरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान संध्याकाळी त्यांचे निधन झाले. या दुःखद घटनेची पुष्टी जालंधर पोलिसांनी आणि त्यांच्या जीवनावर 'द टर्बनेड टॉर्नेडो' हे पुस्तक लिहिणारे लेखक खुशवंत सिंग यांनी केली आहे.