rahul gandhi an pm narendra modi
sakal
नवी दिल्ली - माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सुरू असलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज पूर्णपणे विस्कळित झाल्याने राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज उत्तर देता आले नाही. आता उद्या (ता. ५) ते उत्तर देतील. यावरून राहुल गांधींनी पंतप्रधानांना लक्ष्य केले.