भाजपला काँग्रेस घाबरली? कार्यालयात लावला इंदिरा गांधींसोबत सरदार पटेलांचा PHOTO | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DK Sivakumar

काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

काँग्रेस घाबरली? कार्यालयात लावला इंदिरा गांधींसोबत सरदार पटेलांचा PHOTO

बंगळुरु : कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार (DK Sivakumar) यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये डीके भाजपच्या भीतीपोटी काँग्रेस कार्यालयात देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांचा फोटो लावण्याबाबत बोलत आहेत. वास्तविक, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ 31 ऑक्टोबरचा आहे. या दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बंगळुरू येथील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात डीके शिवकुमार यांना सरदार पटेल यांचा फोटो लावण्यास प्रवृत्त करण्यात आलं. या कार्यक्रमात मंचावर उपस्थित सिद्धरामय्या आणि शिवकुमार एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहे. याच दरम्यान, काँग्रेस नेते सिद्धरामय्या (Former Karnataka Chief Minister Siddaramaiah) यांनी डीके शिवकुमार यांना इंदिरा गांधींसोबत (Indira Gandhi) सरदार पटेल यांचाही फोटो मंचावर लावला पाहिजे, असं सांगताहेत.

व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार यांना पटेल यांचा इंदिरा गांधींसोबत फोटो लावण्यास सांगत आहेत. त्यांचं म्हणणं आहे, की आपण पक्ष कार्यालयात पटेल यांचा फोटो लावला पाहिजे. असं न केल्यास भारतीय जनता पक्ष आपल्यावर टीका करू शकतो. त्यामुळं सरदार पटेल यांचा फोटो लावणं गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये सिद्धरामय्या यांना प्रत्युत्तर देताना शिवकुमार म्हणाले, आपण पटेलांचा फोटो कधीच लावत नाही, असं ते बोलताना दिसत आहेत. मात्र, नंतर डीके काँग्रेस कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला सरदार पटेल यांचा फोटो आणण्याची सूचना करताना दिसताहेत.

हेही वाचा: DCC Bank Election : साताऱ्यात लवकरच राजकीय भूकंप?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसनं बंगळुरू येथील कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ याच कार्यक्रमातील आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. हा व्हिडिओ भाजपचे आमदार आणि माजी मंत्री खासदार रेणुकाचार्य यांनी जारी केलाय. शिवकुमार यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमुळे त्यांच्यावर दबाव येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबरच्या सुरुवातीला एका व्हायरल व्हिडिओमध्ये कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे मीडिया समन्वयक एमए सलीम आणि माजी लोकसभा खासदार व्ही. एस. उग्रप्पा यांनी शिवकुमार दारूच्या नशेत बोलतात आणि लाच घेतात, असा त्यांनी आरोप केला होता. आता नवीन व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: 'भाजपला सोबत घेतल्यामुळं 'राष्ट्रवादी'चं कोणतंही नुकसान झालं नाही'

loading image
go to top