esakal | केबल ऑपरेटरने केली महिला डॉक्टरची हत्या; अफेअरच्या वादातून हत्येचा संशय
sakal

बोलून बातमी शोधा

nisha singhal

हल्लेखोर सेट टॉप बॉक्सचा बहाणा करुन संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या घरात शिरला. 

केबल ऑपरेटरने केली महिला डॉक्टरची हत्या; अफेअरच्या वादातून हत्येचा संशय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आगरा : उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये एका महिला डॉक्टरची दिवसाढवळ्या चाकूने मारुन हत्या करण्यात आली आहे. ही घटना काल शुक्रवारी दुपारी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती सेट टॉप बॉक्स रिचार्ज करण्याच्या बहाण्याने घरात घुसला आणि त्याने हा खून केला. या आरोपीने पेशाने डॉक्टर असणाऱ्या डेन्टिस्ट निशा सिंघल यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांचा गळा चिरला. ज्यावेळी ही घटना घडली तेंव्हा निशा सिंघल यांची दोन्ही मुले घरातील दुसऱ्या खोलीत होती. त्यांचा एक मुलगा 8 वर्षांचा तर दुसार 4 वर्षांचा आहे. निशा सिंघल यांचं वय 38 वर्षे आहे. 

हेही वाचा - ट्रकला धडकल्यानंतर कारने घेतला पेट; आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू 

हल्लेखोर सेट टॉप बॉक्सचा बहाणा करुन संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या घरात शिरला. 
हल्लेखोराने या डॉक्टरांच्या मुलावर देखील हल्ला केला आहे. परंतु, ते या हल्ल्यात वाचले आहेत. डॉक्टर सिंघल यांचे पती अजय सिंघल एक सर्जन आहेत आणि हत्येच्या वेळी ते हॉस्पिटलमध्ये होते. या घटनेची माहिती मिळताच ते घरी पोहोचले आणि आपल्या पत्नीला जखमी अवस्थेत घेऊन ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र, हॉस्पिटलमध्ये पोहोचताच त्यांचा मृत्यू झाला. 

डॉक्टर आणि आरोपीच्या दरम्यान व्हायची मोठी बातचित
मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर आणि शुभम यांच्यादरम्यान फोनवर मोठी बातचित व्हायची. पोलिसांना याचे पुरावे मिळाले आहेत. महिला डॉक्टरने काही दिवसांपूर्वीच आरोपी शुभमची आर्थिक मदत करत त्याच्या घराजवळ मोबाईलचे दुकान उघडून दिले होते.

हेही वाचा - "धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या दोन महामारींनी देश ग्रस्त"
पोलिसांनी CCTV फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीचे नाव शुभम पाठक असं सांगितलं जात आहे. आज सकाळीच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने डॉक्टर सिंघल यांची हत्या केल्यानंतर तसेच त्यांच्या मुलांवर हल्ला केल्यानंतरही एक तास त्यांच्याच घरी होता.