ट्रकला धडकल्यानंतर कारने घेतला पेट; आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

मोठ्या ट्रकला कार धडकल्यानं 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कारला आग लागली आणि त्यात असलेल्या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. 

सुरेंद्रनगर - गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात एका ट्रकचा आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये सहा लोकांचा जागीच होरपळून मृत्यू झाला आहे. मालवन खेरवा जवळच्या रामापीर मंदिराजवळ ही दुर्घटना घडली आहे. 

मोठ्या ट्रकला कार धडकल्यानं 6 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर कारला आग लागली आणि त्यात असलेल्या सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. आग इतकी भीषण लागली की त्यात जळालेले मृतदेह ओळखणं कठीण झालं होतं. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाटन जिल्ह्यातील एक कुटुंब गाडीतून घरी परतत होते. यावेळी गाडीला अपघात झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलं असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये गॅस किट होते त्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एफएसएल टीम आता पुढील तपास करणार आहे. कारच्या नंबर प्लेटवरून आता त्या लोकांची ओळख पटवण्यात येणार आहे. सुरेंद्रनगर जिल्ह्याचे पोलिस उपअधीक्षक एचपी दोषी यांनी या दुर्घटनेत सात जण ठार झाल्याचं म्हटलं आहे. 

हे वाचा - अमेरिकेत मॉलमध्ये बेछूट गोळीबारात 8 जण जखमी; हल्लेखोर फरार

याआधी सकाळी पालनपूर महामार्गावर एक हिट अँड रनची घटना घडली आहे. पालनपूर इथल्या गाथमाना पटिया इथं चिराग प्रजापती आणि त्याच्या मित्राला भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये चिराग प्रजापतीचा मृत्यू झाला असून त्याच्या मित्रावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gujrat truck accident car burn 6 death