esakal | VIDEO : हत्तीण पडली मोठ्या विहरीत; 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर काढलं बाहेर
sakal

बोलून बातमी शोधा

elephant

उंच अशा विहरीतून या प्राण्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजे दिव्यच!

VIDEO : हत्तीण पडली मोठ्या विहरीत; 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर काढलं बाहेर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ही घटना आहे तमिळनाडूतील. हत्तीचं एक मादी पिल्लू मोठ्या विहरीत पडल्याची घटना काल समोर आली होती. हत्ती हा प्राणी तसा वजनाने अवाढव्य. उंच अशा विहरीतून या प्राण्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजे दिव्यच! तरीही या हत्तीणीला सहिसलामत पद्धतीने बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

हेही वाचा - Positive Story : मानलं राव! नोकरी सोडून शैलजा घेतेय भटक्या कुत्र्यांची काळजी

या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, हत्तीणीला बांधून तिला भल्यामोठ्या विहरीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. 

हत्तीण ज्या विहरीत पडली होती, ती इतकी मोठी होती की त्या हत्तीणीला त्या विहरीतून स्वत:हून बाहेर पडणे कदापी शक्य नव्हते. अशावेळी तिचे प्रयत्न असहाय्य होते. अयशस्वी प्रयत्नांनी काहीही साध्य होणार नाही, अशा विचित्र परिस्थितीत ती सापडली होती. अशावेळी तिचा जीव वाचवणे, आवश्यक होते. मानवी मदतीशिवाय ती प्राणाला मुकली असती, हे खरं. धर्मपुरी जिल्ह्यातील पंचपल्ली गावातील ही घटना.

हत्तीण पडलीय हे समजल्यावर गाव गोळा झालं. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. पोलिसही आले. हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न गावकऱ्यांनी सुरु केले. प्रशासनाला बोलावण्यात आलं. मोठ्या यंत्रसामग्रीसह त्या हत्तीणीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झालेत. आणि आश्चर्य म्हणजे या भल्या मोठ्या उंचीच्या विहरीतून त्या हत्तीणीला बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. 16 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सरतेशेवटी  प्रशासनाला हे यश प्राप्त झालं आहे. अग्निशमन दलाकडून हे कठीण ऑपरेशन पार पाडण्यात आलं आहे. 

हेही वाचा - 'छप्पर फाडके' घरात पडलेल्या दगडाने तरुणाला बनवलं कोट्यधीश

16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर काल रात्री या हत्तीणीला बाहेर काढल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. भूतदयेच्या अशा अनेक कहाण्या पहायला मिळाल्यावर माणूसकीबाबतच विश्वास अधिक वृद्धिंगत होतो, यात शंका नाही. 
 

loading image
go to top