esakal | Positive Story : मानलं राव! नोकरी सोडून शैलजा घेतेय भटक्या कुत्र्यांची काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

shailaja hydrabad

हे काम ती तब्बल दोन वर्षांपासून न थकता, न थांबता अविरतपणे करत आहे. 

Positive Story : मानलं राव! नोकरी सोडून शैलजा घेतेय भटक्या कुत्र्यांची काळजी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तेलंगणा : भूतदया हा सर्वांत मोठा गुण आहे. माणसाला भूतदयेतून त्याच्या माणूसपणाचा प्रत्यय येतो. अनेक लोकांचा मुक्या जनावरांवर जीव असतो. त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती हा त्यांचा विशेष गुण असतो. या प्राण्यांच्या वेदना जाणून घेत त्यांच्याही संवेदना जाग्या झालेल्या असतात. अशाच संवेदना जाग्या झालेल्या एका युवतीचे कार्य सध्या व्हायरल होत आहे. तेलंगणामधील शैलजाची ही कहाणी आहे. ती भटक्या कुत्र्यांना खायला घालणे, अडचणीत असतील तर त्यांची सुटका करणे आणि त्यांचे निर्जंतुकीकरण करणे या प्रकारचे काम करत आहे. हे काम ती तब्बल दोन वर्षांपासून न थकता, न थांबता अविरतपणे करत आहे. 

हेही वाचा - घ्या! मुतखड्याच्या ऑपरेशनवेळी डॉक्टरने काढली किडनी; म्हणाले, सो सॉरी! चूक झाली

लॉकडाऊनच्या दरम्यान माणसांचेच हाल झाले  होते. अशावेळी भटक्या जनावरांचे त्रास कुणाच्याही खिजगणतीतही नव्हते. पण, सगळा देशच बंद असल्याने अनेक भटक्या प्राण्यांचे हाल या दरम्यान झाले आहेत. शैलजा सारख्या संवेदनक्षम व्यक्ती अशा परिस्थितीत या मुक्या जनावरांच्या काळजीपोटी हळहळतात आणि कृतीप्रवण होतात. याबाबत बोलताना तिने म्हटलंय की, आधी मला कुत्र्यांची खूप भीती वाटायची. पण 2018 मध्ये माझ्या कुंटुंबियांनी एक कुत्रा पाळला. त्यानंतर मी अशा पाळीव प्राण्यांबद्दल कनवाळू झाले आणि मग मी अशा प्राण्यांची काळजी घ्यायला लागले.

हेही वाचा - 'मोदी सरकारचे रिपोर्ट कार्ड; कोरोना मृत्यूदरात सर्वांत पुढे, जीडीपीत मागे'

मी आधी एका हॉटेलमध्ये काम करायचे. पण नंतर कुत्र्यांची काळजी घेण्याचे हे काम करता यावं म्हणून मी ते काम सोडले. मी माझ्या बचतीतील रक्कम देखील त्यासाठी खर्ची घालवली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान माझी सारी बचतीची रक्कम खर्ची गेली. मग म्हणून मी फेसबुकवरुन मदत मागायला सुरवात केली. काही दानशूर व्यक्तींनी कुत्र्यांचे खाद्य पुरवून माझ्या या उपक्रमाला मदत केली. हे कुत्र्याचे खाद्य मी अंडी आणि भातासोबत मिसळून कुत्र्यांना देत आहे. भविष्यात कुत्र्यांच्या काळजीपोटी निवारा अथवा एखादं पाळणाघर उघडण्याचा माझा मानस आहे, असं शैलजाने म्हटलं आहे.