
रम्मी खेळण्याचं व्यसन लागल्यानं एका शिक्षिकेवर चोरीची वेळ आली. तिने बुरखा घालून ८ लाख रुपयांची चोरी केली पण शेवटी तिला अटक करण्यात आलीय. अहमदाबादच्या मेघानीनगर इथं एका नर्सिंग कॉलेजची उपप्राचार्य असणाऱ्या महिलेनं ८ लाखांची चोरी केली. या प्रकरणात तिला अटक झालीय. महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये बुरखा घालून कॉलेजच्या तिजोरीतून रोकड घेताना दिसते. तिच्या डोळ्याजवळ असलेल्या तिळामुळे ओळख पटली आणि सगळ्या प्रकाराचा उलगडा झाला.