पवारांवर गुन्हा दाखल झाला तसा मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करा- शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 September 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जसा गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी  हमी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
 

शिरोळ (कोल्हापूर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जसा गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी  हमी देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला तरी ज्यांनी कर्जे घेतली ते मोकाटच आहे. असे कर्ज घेतलेले अनेक लोक सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत त्यामुळे यांच्यावर ईडीची कारवाई करणार का? असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला.

ईडीकडून निवडणुकीच्या वातावरण निर्मितीपोटी अशी कारवाई केली जात असल्याचा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला यावेळी लगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: files crime against CM devendra Fadanvis says Raju shetty