esakal | मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निकाल देण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Reservation

मराठा आरक्षणाबाबत आज अंतिम निकाल देण्याची शक्यता

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) आज रोजी मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) अंतिम निकाल (Result) देण्याची शक्यता आहे. न्या. अशोक भूषण, न्या. एल. नागेश्‍वरराव, न्या. एस. अब्दुल नाझीर, न्या. हेमंत गुप्ता आणि न्या.एस. रवींद्र भट यांचे घटनापीठ याबाबत निकाल देईल. (Final Result on Maratha reservation is likely to be given today)

राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्याच्या (एसईबीसी) वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायपीठ फैसला करेल. या कायद्यान्वयेच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. तत्पूर्वी न्यायालयाने २६ मार्च २०२१ रोजी झालेल्या सुनावणीवेळी याबाबतचा निकाल राखून ठेवला होता.

हेही वाचा: आंध्र प्रदेशात आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन; १५ पट अधिक आक्रमक असल्याचा दावा

महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आरक्षण कायद्यान्वये (एसईबीसी) मराठा समाजाला विविध शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सोळा टक्के आरक्षण देण्यात आले होते. याबाबत जून- २०१९ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने या कायद्याच्या वैधतेवर शिक्कामोर्तब केले होते पण शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठीचा कोटा बारा टक्के तर सरकारी नोकऱ्यांमधील कोटा १३ टक्क्यांपर्यंत घटविला होता. उच्च न्यायालयाच्या या निकालाला पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होते. येथे इंद्रा सहानी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने न्यायालयाने याबाबत सर्व राज्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी इंद्रा साहानी खटल्यामध्ये देण्यात आलेल्या निकालावर फेरविचार केला जावा अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. या प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्या खंडपीठामध्ये अनेक मुद्द्यांबाबत मतभेद होते असेही राज्यांनी म्हटले होते.

loading image