‘एलजी पॉलिमर इंडिया’ या कंपनीला ठोठावला दंड; किती ते वाचा

पीटीआय
Saturday, 9 May 2020

गळती झालेला स्टेरेन ६० टक्के निष्क्रिय 
विशाखापट्टणमधील एलजी पॉलिमर या कंपनीच्या औद्योगिक प्रकल्पातून आत्तापर्यंत बाहेर पडलेला ६० टक्के स्टेरेन वायू निष्क्रिय केला असून घटनास्थळावरील रसायनांच्या सर्व टाक्या सुरक्षित केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी व्ही. विनय चांद यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिली.

नवी दिल्ली - विशाखापट्टणमधील ‘एलजी पॉलिमर इंडिया’ या कंपनीच्या औद्योगिक प्रकल्पातून काल स्टेरेन या विषारी वायू गळतीमुळे बारा लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल ५० कोटी रुपयांचा हंगामी दंड भरण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कंपनीला दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या घटनेत नियम व अन्य वैधानिक तरतुदींचे पालन झाले नसल्याचे दिसून आले आहे. याबद्दल केंद्र आणि संबंधितांकडून ‘एनजीटी’ने उत्तर मागविले आहे.

लवादाचे अध्यक्ष न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. विषारी वायू गळतीमुळे लोकांचे आयुष्य आणि पर्यावरणाची हानी झाल्याने कंपनीने ५० कोटी रुपये जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जमा करावेत, असा आदेश देत आहोत, असे या खंडपीठाने म्हटले आहे.

गळती झालेला स्टेरेन ६० टक्के निष्क्रिय 
विशाखापट्टणमधील एलजी पॉलिमर या कंपनीच्या औद्योगिक प्रकल्पातून आत्तापर्यंत बाहेर पडलेला ६० टक्के स्टेरेन वायू निष्क्रिय केला असून घटनास्थळावरील रसायनांच्या सर्व टाक्या सुरक्षित केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी व्ही. विनय चांद यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fined to LG Polymer India Company