कंगणाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल; शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणं भोवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut

कंगणाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल; शेतकऱ्यांना 'खलिस्तानी' ठरवणं भोवलं

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: कंगणा राणावत एकेकाळी आपल्या चांगल्या अभिनयासाठी ओळखली जायची. मात्र, आता कंगणा म्हणजे बेताल वक्तव्य असं समीकरण झालं आहे. कंगणाची ही ओळख व्हायला ती स्वत:चं कारणीभूत आहे. गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चुकीची आणि बेताल अशी वक्तव्य करत तिने आपल्या बुद्धीचं दर्शन घडवलं आहे. मग स्वातंत्र्यलढ्याविषयीची वक्तव्ये असोत वा सद्य घडामोडींबाबतची वक्तव्ये असोत. ही वक्तव्ये करताना ती सडेतोडपणे आक्षेपार्ह अशी वक्तव्ये करत सुटली आहे. ही वक्तव्ये आता कंगणाला भोवण्याची शक्यता आहे. कारण आता कंगणावर या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे.

हेही वाचा: ...यामुळे नितीन गडकरींनी 'मारुती सुझुकी'चे केले अभिनंदन

पंतप्रधान मोदींचं आणि भाजप पक्षाचे वारंवार कौतुक करणारी कंगणा शेतकरी कायदे मागे घेतल्यानंतर मात्र अत्यंत भडकलेली दिसून आली. भारताला स्वातंत्र्य १९४७ ला नाही तर २०१४ ला मिळालं असं म्हणून आपल्या अकलेचे तारे तोडले होते. त्यानंतर तिने शेतकरी आंदोलनाला खलिस्तानी चळवळ म्हणून संबोधलं होतं. याबाबतच आता तिच्याविरुद्ध मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'अब्बाजान, चच्चाजानच्या लोकांनी लक्षात ठेवावं...', योगींचा ओवैसींना इशारा

काय म्हणाली होती कंगणा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर कंगणाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आपण निराश झाल्याचे म्हटलं होतं. यावर तिनं सोशल मीडियावरुन एक पोस्ट देखील शेयर केली होती. त्यामध्ये आपल्याला कृषी कायदा रद्द केल्यानं वाईट वाटल्याचे तिनं सांगितलं. दु;खदायक, क्लेशकारक आणि लज्जास्पद तसेच सर्वार्थानं चूकीचा असा निर्णय घेतल्याचे कंगनानं म्हटलं होतं. जर आता लोकं रस्त्यावर येवून कायदा तयार करु लागले तर काय बोलायचे. म्हणजे ज्या सरकारला आपण निवडून दिले आहे ते जो कायदा तयार करतात त्याचा मान न ठेवता रस्त्यावर उतरुन कायदा तयार केला जात आहे अशा जिहादी देशाचं कौतूक करायला हवं. असं तिनं म्हटलं होतं.

loading image
go to top