esakal | Lakhimpur Kheri violence : प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka gandhi

प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात FIR; शांतता भंग केल्याचा आरोप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये (lakhimpur kheri violence) झालेल्या हिंसाचारात चार शेतकीर ठार झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी (congress leader priyanka gandhi) गेल्या असता त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. कालपासून त्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात तणाव निर्माण झाल्यामुळे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आता शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली प्रियांका गांधींसह ११ जणांविरोधात (FIR against priyanka gandhi) एसएचओ हरगाव पोलिस ठाण्यात (SHO Hargaon police station) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबत एनआयएनने वृत्त दिले आहे.

हेही वाचा: Lakhimpur Violence : शेतकऱ्यांच्या मृत्यूवर PM मोदी गप्प का? - कन्हैया

लाखीमपूर खेरीमध्ये मौर्य यांचा ताफा जात असताना शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. त्यानंतर दोन गाड्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये घुसल्या आणि शेतकऱ्यांना चिरडले. यामध्ये चार शेतकऱ्यांचा तर चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील वातावरण तापले असून अनेक राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट देण्यासाठी उत्तर प्रदेशकडे धाव घेतली. यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधींचा देखील समावेश होता. मात्र, त्यांना युपी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना सितापूर येथे ठेवण्यात आले. सोमवारी सायंकाळपर्यंत युपीतील वातावरण आणखीच चिघळले होते. त्यामुळे त्याठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले होते. प्रियांका गांधी यांना सितापूर येथील पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे. प्रियांका गांधींना सोडण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने सितापूर येथे निदर्शने केली. कलम १४४ देखील लागू असताना त्यांनी निदर्शने चालूच ठेवली. त्यामुळे प्रियांका गांधींसह दीपेंद्र हुडा, अजयकुमार लल्लू यांच्या विरोधात शांतता भंग कऱण्याच्या आरोपाखाली सितापूर येथील पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, छत्तीसगडे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी देखील प्रियांका गांधींना पाठींबा देण्यासाठी उत्तर प्रदेश गाठले. मात्र, त्यांना प्रियांका गांधींना ठेवण्यात आलेल्या सितापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यांना विमानतळावरच रोखून धरण्यात आले. त्याबाबत भूपेंद्र बघेल यांनी निषेध व्यक्त केला आहे.

loading image
go to top