esakal | lakhimpur kheri violence : 'शेतकऱ्यांच्या मृत्यूवर पंतप्रधान मोदी गप्प का?'
sakal

बोलून बातमी शोधा

Pm Modi

Lakhimpur Violence : शेतकऱ्यांच्या मृत्यूवर PM मोदी गप्प का? - कन्हैया

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे हिंसाचार (lakhimpur kheri violence) होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश असून चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसेच एका पत्रकाराचा समावेश आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलासह १५ जणांविरोधात तिकोनिया पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी (PM Modi) अद्यापही काही प्रतिक्रिया दिली नाही. यावरूनच नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या तरुण कार्यकर्ता कन्हैया कुमारने (kanhaiya kumar) पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

हेही वाचा: Lakhimpur kheri Violence : ...तर राज्यात जेलभरो आंदोलन करू, काँग्रेसचा इशारा

'प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणारे प्रचारमंत्री (पंतप्रधान) आता शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणावर का गप्प बसलेत? ते शेतकऱ्यांचे अन्न नाहीतर, बेईमान लोकांकडून कमीशन खातात का? त्यामुळेच पंतप्रधान काही बोलत नाहीत का?' असा सवाल कन्हैया कुमारने उपस्थित केला आहे.

मौर्य यांचा ताफा तिकोनिया चौकातून गेला, तेव्हा त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. हे पाहताच शेतकरी संतप्त झाले. त्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावली. या घटनेत चार शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे सांगितले जाते. तर चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय. त्यानंतर केंद्रीय गृहराज्य मंत्री यांच्या मुलासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर भेट देण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेशीवरच रोखण्यात आले. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना ताब्यात घेण्यात आले. सध्या उत्तर प्रदेशातील वातावरण तापलं असून पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

loading image
go to top