दिल्लीतील एम्स रुग्णालयात आग

दिल्लीतील एम्स रुग्णालयात आग

नवी दिल्ली : दिल्लीतील नामांकित रुग्णालय एम्समध्ये आग लागल्याची घटना आज (शनिवार) घडली. एम्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. 

एम्स रुग्णालयात अनेक बड्या नेत्यांवर उपचार केले जात आहेत. त्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्धही आहे. या रुग्णालयात आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यातील सर्वांत महत्वाची बाब म्हणजे माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हेदेखील याच रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, अरुण जेटली यांच्यावर ज्या विभागात उपचार केले जात आहेत. तिथंपर्यंत आग पोहोचली नाही. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com