पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आग लागल्याने रस्ता बंद

वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

  • अग्निशमनच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल
  • आग विझवण्याचे प्रयत्न चालू
  • आगीची तीव्रता कमी; आगीचे कारण अस्पष्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थान असलेल्या ७ लोककल्याण मार्ग या निवासस्थानी आग लागली आहे. आग विझवण्यासाठी नऊ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आग लागल्याने पंतप्रधान निवास ७ लोककल्याण मार्ग येथील रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पाण्याचे बंब आणि अग्निशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. येथील ९ क्रमांकाच्या बंगल्यामध्ये ही आग लागली असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाजात सांगण्यात येत आहे. आगीचे स्वरुप मोठे नाही असेही सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमनचे ९ बंब दाखल झाले आहेत. तर ४ अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग गंभीर स्वरुपाची नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व महत्वाची काळजी घेण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire has been reported at PM residence at 7 Lok Kalyan Marg New delhi