

Firing Reported at Toll Plaza on Gwalior Bhind Highway
Esakal
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवासात होणाऱ्या त्रासाला वैतागून एका प्रवाशानं धक्कादायक असं पाऊल उचललं आहे. एका बाजूला टोल वसुली केली जाते पण रस्त्यांची देखभाल दुरुस्ती केली जात नसल्यानं वाहनधारकानं थेट टोल नाक्यावर गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हायवे दुरुस्त करण्याची मागणी करत गोळीबार केला आणि एक चिठ्ठीही घटनास्थळी फेकली. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर-भिंड महामार्गावर असलेल्या बरैठा टोल नाक्यावर हा प्रकार घडलाय.