फिरोजाबाद : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात (Firozabad Case) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मूल न होण्याच्या मानसिक तणावातून दिलासा मिळावा म्हणून, हाथरस येथील एका विवाहित महिलेने एका कथित बाबाकडे मदतीसाठी धाव घेतली. मात्र, 'औषध' आणि 'तांत्रिक उपचार' देण्याचे आमिष दाखवून त्या बाबाने महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.