कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं पण कोव्हॅक्सिनच्या अंतरात बदल का नाही केला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 corona vaccination

'कोव्हिशिल्ड इतका कोव्हॅक्सिनचा पहिला डोस प्रभावी नाही'

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: सध्या देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा (vaccination drive) मोठा तुटवडा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील जिवीतहानी पाहून नागरिक मोठ्या प्रमाणावर लसीकरणाबद्दल जागरुक झाले आहेत. नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी जात आहेत. १८ ते ४४ वयोगट असो किंवा ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनाच लस हवी आहे. पण लसी तितक्या प्रमाणात उपलब्ध नाहीयत. त्यामुळे अनेकांना लस केंद्रांवर (vaccination center) जाऊन लसीचा डोस घेतल्याशिवाय माघारी फिरावे लागतेय. एकूणच या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक दृष्टीकोनातून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (first Covaxin dose not as effective as Covishield)

यामध्ये 'कोव्हिशिल्ड'च्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे. सुरुवातीला कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यांमध्ये घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण आता हे अंतर १२ ते १८ आठवड्यांनी वाढवण्यात आले आहे. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर इतकं का वाढवण्यात आलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

हेही वाचा: 'मित्रांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना पाहिले', 'टायटॅनिक पेक्षाही भयानक स्थिती'

कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवलं असलं, तरी कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमध्ये जे अंतर आहे, त्यात कुठलाही बदल केलेला नाही. कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जितकी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते, त्या तुलनेत कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर तयार होत नाही. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आलेलं नाही.

हेही वाचा: महत्त्वाचं निरीक्षण: लसीचे दोन डोस घ्या, मृत्यूचा धोका टळेल

कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये तीन महिन्यांचे अंतर बंधनकारक का करण्यात आले? सरकारने असा निर्णय का घेतला? त्या बद्दल ICMR चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्टीकरण दिले. "कोव्हिशिल्डचा पहिल्या डोस नंतर मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचे दिसून आले. तीन महिन्यांच्या अंतरामुळे अजून चांगला रिझल्ट मिळेल. त्याचवेळी कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर रोगप्रतिकारक शक्ती तितकी वाढली नाही. त्यामुळे चार आठवड्यांनी दुसरा डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिन पूर्णपणे प्रभावी ठरेल" असे डॉ. भार्गव म्हणाले.

loading image
go to top