Kerala News : तृतीयपंथी जोडपे झाले आई-बाबा !

केरळमधील रुग्णालयात प्रसुती; भारतातील पहिलीच घटना
first in india kerala transgender couple gives birth to a baby
first in india kerala transgender couple gives birth to a babysakal
Updated on

transgender couple gives birth to baby : केरळमधील झिया पवल आणि जाहद या तृतीयपंथी जोडप्याला मूल झाले आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयात या जोडप्यांपैकी जाहदची प्रसूती झाली आहे. तृतीयपंथीयांना मूल होण्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याच दावा केला जात आहे.

‘‘सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आज सकाळी साडेनऊ वाजता शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झाली. बाळ आणि झहादची प्रकृती उत्तम असल्याचे झिया पवलने सांगितले. मात्र मुलगा झाला की मुलगी हे त्यांनी जाहीर केलेले नाही.

ही बाब लगेच जाहीर करू इच्छित नसल्याचे त्यांनी सांगितले. इन्स्टाग्रामवर छायाचित्र पोस्ट करून जाहद आठ महिन्यांचा गर्भवती असल्याचे पवलने नुकतेच जाहीर केले होते. ‘‘माझा जन्म किंवा शरीर स्त्रीचे नव्हते.

पण माझ्यातील स्त्रीचे आई होण्याचे आणि त्याचे बाबा होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. आठ महिन्यांचा गर्भ जाहदच्या पोटात आहे. तृतायपंथीय पुरुषाची गर्भधारणा ही भारतातील पहिलीच घटना असल्याचे आम्हाला समजले आहे,’’ असे पोस्टमध्ये म्हटले होते.

लिंग परिवर्तनानंतर गर्भधारणा

पवल आणि जाहद हे गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जाहदचे लिंग परिवर्तन महिलेतून पुरुषात झाले आहे. लिंग परिवर्तन प्रक्रियेनंतर गर्भधारणा झाली तरी कोणताही शारीरिक त्रास जाणवला नाही,’ असे कोझिकोड वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

एका वृत्तपत्रातील वृत्तानुसार लिंग परिवर्तन शस्त्रक्रियेच्यावेळा जाहदचे स्तन काढण्यात आले होते. पण गर्भायश आणि अन्य अवयव तसेच ठेवले होते. त्यामुळेच गर्भधारणा शक्य झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.