esakal | Budget 2020: गोष्ट भारताच्या पहिल्या बजेटची!
sakal

बोलून बातमी शोधा

parliment

येत्या शनिवारी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प अर्थात बजेट मांडणार आहेत. या बजेटच्या पार्श्वभूमीवर बजेट विषयीच्या काही रंजक गोष्टी आपण समजून घेऊ या.

Budget 2020: गोष्ट भारताच्या पहिल्या बजेटची!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

येत्या शनिवारी 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प अर्थात बजेट मांडणार आहेत. या बजेटच्या पार्श्वभूमीवर बजेट विषयीच्या काही रंजक गोष्टी आपण समजून घेऊ या. भारतात सगळीकडं संस्थानिकाचं राज्य होतं. त्यांच्या काळात अर्थसंकल्प ही संकल्पनाच नव्हती. त्यांचा प्रत्येकाचा जमा खर्च, तोच त्यांचा अर्थसंकल्प असायचा. इंग्रज आल्यानंतर भारताला अर्थसंकल्प अर्थात बजेटची ओळख झाली. त्यावेळी भारतावर ब्रिटनच्या राजघराण्याचं राज्य होतं. त्यामुळं भारताचा अर्थसंकल्प ब्रिटनच्या घारण्याला सादर केला जायचा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणी बनवलं भारताचं पहिलं बजेट!
भारतात पहिला अर्थसंकल्प ईस्ट इंडिया कंपनीने 7 एप्रिल 1860 रोजी ब्रिटनच्या राजगादीला भारताचे तत्कालीन अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय अर्थसंकल्प ही संकल्पना 7 एप्रिल 1860 रोजी स्विकारली. या कंपनीचा मालकी आता मुंबईमध्ये जन्मलेल्या संजीव मेहता यांच्याकडे 2005 पासून आहे. विल्सन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने देशात नवीन कर प्रणाली सुरू झाली, तसेच कागदी नोटांच्या स्वरूपात चलन व्यवहारात आले. आज लाखो प्रतींचा खप असलेले, जगात ख्यातनाम असे "द इकॉनॉमिस्ट' या नियतकालिकाची सुरवात विल्सन यांनी केली. त्यांनी ते वर्तमानपत्र स्वरूपात सुरू केले होते. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर काही महिन्यांतच कलकत्ता येथे जुलाबाने विल्सन यांचा 11 ऑगस्ट 1860 रोजी मृत्यू झाला. अर्थसंकल्पासाठीचा "बजेट' हा शब्द मूळ फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. त्याचा अर्थ चामड्याची बॅग असा होतो. 

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)

loading image
go to top